काश्मीरचं स्वर्गासारखं सौंदर्य, पाहलगामचं शांतीनं भरलेलं वातावरण आणि त्यातच अचानक झालेला दहशतवादी हल्ला – देशाचं काळीज हादरून टाकणारी हि घटना आहे. पण जनतेचं एकजुटीचं आणि धैर्याचं उदाहरण सगळ्या जगाला पाहायला मिळालं. तर चला, मित्रांनो जाणून घेऊया या हा हल्ला (Pahalgam Terror Attack In Marathi) नेमका का झाला? याचे मागे कोण होत? आणि आता भारताची प्रतिक्रिया काय असणार? पाहूया खालील लेखात!
पाहलगाम म्हणजे काय?
अनुक्रमणिका
मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल पाहलगाम हे जम्मू-काश्मीरमधील एक सुंदर आणि टुरिस्ट फ्रेंडली ठिकाण मानले जाते. इथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. येथे बर्फाच्छादित पर्वत, हिरवीगार दऱ्या, शांत नद्या आणि गोड टूरिस्ट लोकेशन्स जसं काय तुम्ही एका स्वप्नातच आहात. पण २२ एप्रिल २०२५ रोजी या स्वर्गात नरकासारखा क्षण पाहण्यास मिळालं.
काय घडलं नेमकं?
२२ एप्रिल २०२५ ला दुपारी २.५० वाजता, अनंतनाग जिल्ह्यातील बायसरन व्हॅली – पाहलगाम येथे पर्यटकांच्या ग्रुपवर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. एवढेच नव्हे तर ते लष्करी पोशाखात आले होते.
- मृत्यू: किमान २८ पर्यटकांचा मृत्यू.
- जखमी: २० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी.
- हत्यारं: AK-47 आणि M4 कार्बाईन वापरली गेली.
- पीडित: महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, केरळ, हरियाणा व इतर राज्यांतील पर्यटक.
- परदेशी नागरिक: नेपाळ आणि UAE येथील दोन नागरिकही मृतांमध्ये.
हल्ल्याच्या मागे कोण होतं?
या हल्ल्यामागे ‘The Resistance Front (TRF)’ या दहशतवादी संघटना आहे असे म्हटले जाते. TRF ही लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिदीनशी संबध आहे असे म्हटले जाते.
TRF चं स्टेटमेंट:
“काश्मीरच्या विशेष दर्जा हटवल्यामुळे झालेल्या जनसांख्यिकीय बदलांचा निषेध म्हणून आम्ही हा हल्ला केला.”
म्हणजे स्पष्टपणे सांगायचं तर, बाहेरून येऊन काश्मीरमध्ये वसणाऱ्या लोकांवर हे टार्गेटेड अटॅक होता. हल्लेखोरांनी काही पर्यटकांना ‘कलमा’ म्हणायला लावलं आणि त्यांच्या धर्मावरून गोळी झाडण्यात आली. मित्रांनो हे ऐकूनही अंगावर शहारे नक्कीच आले असतील!
भारत सरकारची फटाफट प्रतिक्रिया
मित्रांनो, हा हल्ला झाला तर आहे, पण आपले भारत सरकार शांत बसेल असे होईल का? हल्ल्याच्या काही तासांतच सरकारने एक्शन मोडमध्ये जाऊन या दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. NIA (राष्ट्रीय तपास संस्था), CRPF, BSF आणि Jammu-Kashmir Police यांचं कॉम्बाईन ऑपरेशन लगेच सुरु करण्यात आले आहे.
- PM नरेंद्र मोदी – सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडून भारतात परतले. थेट सुरक्षेसंबंधी बैठकीचं आयोजन.
- रक्षा मंत्री राजनाथ सिंह – “हा हल्ला अत्यंत भ्याड आहे. दोषींना शिक्षा नक्कीच मिळेल!”
- NIA चा तपास सुरू – हल्लेखोरांपैकी तिघांची स्केचेस जाहीर.
- सैफुल्ला कसुरी उर्फ खालिद – लष्कर कमांडर, मास्टरमाइंड म्हणून संशय.
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया – सगळा जग भारतासोबत
या हल्ल्याचा USA, रशिया, फ्रान्स, UK, UAE, इस्रायल व इतर अनेक देशांनी तीव्र निषेध केला आहे. अमेरिका राष्ट्राध्यक्षांनी ट्विटरवर लिहिलं:
“We stand with India against terrorism. Such attacks on innocent civilians are unforgivable.”
हे पाहून खरंच वाटतं की संकटाच्या वेळी भारत एकटा नाही!
स्थानिक लोकांचं हिरो पथ
मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? या हल्ल्यानंतर स्थानिक मुस्लिम नागरिकांनी मदत केली.
- पोनीवाल्यांनी ११ जखमी पर्यटकांना स्ट्रेचरवर खांद्यावरून उचलून हॉस्पिटलमध्ये पोचवलं.
- स्थानिक दुकानदारांनी छत्तीसगडच्या कुटुंबाला शरण दिलं.
- एका टॅक्सी ड्रायव्हरने स्वतःच्या घरात पर्यटकांना ठेवून त्यांच्या सुरक्षिततेची हमी घेतली.
धर्म नाही, माणुसकी मोठी होती त्या दिवशी!