26 January Speech in Marathi नमस्कार मित्रांनो, 26 जानेवारी येत आहे त्यामुळे तुम्ही पण भाषणच्या शोधात आहात का? तर टेन्शन घायचे काम नाही आम्ही तुमच्यासाठी अगदी छोटे आणि छान भाषण घेऊन आलो आहोत. हे भाषण तुम्ही पाठांतर करून शाळेत एक नंबर येऊ शकतात.
२६ जानेवारी मराठी भाषण 26 January Speech in Marathi
आज आपण सर्वजण विशेष दिनानिमित्त जमलो आहोत, आज दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो, 26 जानेवारी 1950 या दिवशी भारत प्रजासत्ताक बनला आहे. याचा असा आहे कि आपल्या देशाला स्वतःचे नियम आणि अधिकार मिळाले, ज्याला भारतीय संविधान असे हि म्हटले जाते. त्यामुळे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण तो आपल्याला आठवण करून देतो की भारत एक स्वतंत्र आणि निष्पक्ष देश कसा बनला.
भारतात जो पण राहतो तो मग कोणत्या पण धर्माचा असो प्रत्येक भारतीयांसाठी या दिवस अभिमानाचा दिवस आहे. हा दिवस आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि भारताला प्रजासत्ताक बनवण्यासाठी मदत करणाऱ्या शूर लोकांची आपल्याला आठवण करून देतो. खरं तर आपण या दिवशी आपले स्वातंत्र्य आणि एकता, शांतता आणि समता यासारख्या आपल्या देशाच्या मूल्यांचा उत्सव साजरा करतो.
आजच्या दिवशी भारताची ताकद आणि संस्कृती दर्शविण्यासाठी आपली राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठी परेड होते आणि मग भारत आपले सैनिक, रणगाडे आणि सुंदर प्रदर्शने करतो. हा एक असा दिवस मनाला जातो कि या दिवशी आपल्याला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.
पण माझ्या मित्रांनो आणि मैत्रीणींनो हा दिवस केवळ परेड पाहणे नव्हे तर एक चांगला नागरिक बनण्याचा विचार करण्याचा हा दिवस असतो. आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे मग तो मोठा असो किंवा लहान असो प्रत्येकाचा आदर केला पाहिजे, आपण आपल्या देशाला एका चांगल्या स्थानावर नेले पाहिजे.
तर चला मग आपण हा प्रजासत्ताक दिन आनंदाने साजरा करूया आणि आपल्या महान राष्ट्राचे चांगले आणि जबाबदार नागरिक राहण्या प्रतिज्ञा घेऊया.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
जय हिंद!
अंतिम शब्द
तर मित्रांनो वरील लेखात आपण Speech on 26 January in Marathi पाहिले. या लेखात आम्ही २६ जानेवारी यावर छान भाषण देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुमच्या कडे 26 January Speech in Marathi बद्दल आजून काही माहिती असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा.