नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण गुढीपाडवाचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत, गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी नववर्षाची सुरुवात म्हणून ओळखला जातो.
हिंदू कॅलेंडरमध्ये चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येणारा हा सण म्हणून ओळखला जातो. हा सण केवळ नवीन वर्षाचा सण नव्हे तर समृद्ध इतिहास, पौराणिक कथा आणि सांस्कृतिक परंपरा हि दर्शवतो.
गुढीपाडवा हा सण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर काही राज्यांमध्ये सुद्धा साजरा केला जातो. या दिवशी सर्व मित्र कुटुंब परिवार एकत्र येतात आनंदाने साजरा करतात.
गुढीपाडवाचा संपूर्ण इतिहास Gudi Padwa History in Marathi
अनुक्रमणिका
गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो?
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्या तिथीला हा सण साजरा केला जातो. ब्रह्म पुराणानुसार, भगवान ब्रह्मा यांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते.
गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचे प्रतीक जाते, भगवान श्रीराम यांनी याच दिवशी रावणावर विजय मिळवून अयोध्यात आले होते आणि त्या दिवसापासून हा सण साजरा केला जातो.
असे मानले जाते कि या दिवशी वाईट गोष्टी मागे टाकून नवीन सुरुवात करणे याचे प्रतिक मानले जाते. हा सण आनंदाचा आणि उत्सवाचा असतो.
या दिवशी लोक आपल्या घरांवर गुढी उभारतात आणि स्वादिष्ट पदार्थ बनवतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. लोक आपल्या मित्र किंवा नातेवाईकांच्या घरी जातात भेट वस्तू देतात.
गुढीपाडवाचा संपूर्ण इतिहास
गुढीपाडवा हा सण प्राचीन काळापासून साजरा करण्यात येत आहे, तसेच या सणाचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये पाहण्यास मिळतो.
सतवाहन राजांच्या काळापासून या सणाला राजेशाही मान्यता मिळाली आहे, आणि त्या दिवसापासून हा सण साजरा केला जातो आणि याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये हि केला आहे.
तसेच असे मानले जाते कि भगवान श्रीराम यांनी याच दिवशी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आले, त्यामुळे हा दिवस विजयाचा आणि आनंदाचा प्रतीक नाला जातो.
गुढीला ब्रह्मदेवाचा ध्वज मानले जाते आणि त्याला विजय आणि उत्कर्षाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी वाईट गोष्टी विसरून नवीन सुरुवात केली जाते.
गुढीपाडवाचे महत्व
- गुढीपाडवा या दिवशी सर्व वाईट गोष्टी विसरून परत एकदा आपण नवीन सुरुवात करायला हवी.
- या दिवशी आपण नवीन वर्षासाठी नवीन संकल्प करतात आणि नवीन उद्दिष्टे निश्चित करायला हवी.
- गुढीपाडवा हा उत्सव आणि आनंदाचा सण आहे. लोक आपापल्या घरांवर गुढी उभारतात, स्वादिष्ट पदार्थ बनवतात आणि एकमेकांना भेटतात.
- गुढीपाडवा हा सण सामाजिक बंध मजबूत करण्याचा सण आहे.
- गुढीपाडवा हा सण निसर्गाशी ऋणानुबंध दर्शवतो.
हे पण वाचा: गुढीपाडवा सणाची माहिती