मराठा आरक्षणच काय झालं? Maratha Aarakshan Information in Marathi

Maratha Aarakshan Information in Marathi नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण मराठा आरक्षण बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत, मराठा आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) आरक्षण म्हणून ओळखले जाते, या आरक्षणाचा फायदा महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी शिक्षण आणि नौकाऱ्यांसाठी होतो. मनोज जरांगे पाटील यांच्या कठोर प्रयत्नानंतर हे शिंदे सरकारने नवा जीआर जाहीर केला आहे.

Maratha Aarakshan Information in Marathi
Maratha Aarakshan Information in Marathi

मराठा आरक्षण म्हणजे काय?

मराठा हा महाराष्ट्रातील एक मोठा समुदाय मनाला जातो, हा समाज खरं तर राज्याचा लोकसंख्येच्या अंदाजे 30% भाग आहे. तसेच ते सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या श्रेणीमध्ये गणले जातात. तर काही मराठा श्रीमंत जमीनदार आणि शेतकरी आहेत, तर काही मजूर आणि झोपडपट्टीत राहणारे आहेत.

या कारणामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासू लागली, कारण मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीच्या बाबतीत दुर्लक्षित केले जाऊ लागले. 1950 मध्ये जेव्हा अनुसूचित जमातींसारख्या इतर मागासलेल्या समाजासाठी आरक्षण लागू केल्यावर हि समस्या निर्माण झाली.

मनोज जरांगेंच्या कुठल्या मागण्या मान्य?

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आता एकनाथ शिंदे सरकारने नवा जीआर जाहीर केला आहे. जे ‘सगेसोयरे’ आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. ती शिंदे सरकारने मान्य केली आहे. तसेच तुम्हाला माहिती आहे का? मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील यांच्या कडे दिला.

जीआरमध्ये काय आहे?

मित्रांनो जीआर मध्ये काय आहे खालील प्रमाणे आहे….

महाराष्ट्र अनुसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग (जात प्रमाणपत्र देणयाचे व पडताळणी विनियमन) नियम 2012 मध्ये सुधारणा केली जात आहे. अधिनयमाच्या कलम 18 च्या पोटकलम 1 अंतर्गत सुधारणा केली जात आहे.

हा मसुदा महाराष्ट्र शासनाकडून 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येणार आहे. कोणालाही याबाबत काही हरकती किंवा सूचना असल्यास या तारखेपूर्वी त्या सरकारकडं सादर केल्यास त्यावर विचार केला जाईल.

या नव्या नियमाला महाराष्ट्र अनुसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, 2024 म्हटले जाईल.

नियम क्र. 5 मधील उप-नियम (६) मध्ये क्रमशः पुढीलप्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे :-

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्‍तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पध्दतीतील सगेसोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत, अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल.

कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्‍त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्‍तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग ( जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन ) नियम, 2012 नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील.

ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊनच सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील.

ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगेसोयरे म्हणजे, मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पध्दतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.

मराठा

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करता येईल, मात्र या तरतुदीचा दूरुपयोग करता येऊ नये, म्हणून सदर विवाह सजातीय आहे, यासंदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे, हे देखील आवश्यक असेल व याची पुर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जातप्रमाणपत्र देता येतील.

सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील.

नियम क्र. 16. अर्जदाराकडून पुरविण्यात यावयाची माहिती यामध्ये:-

(ज) उपलब्ध असल्यास, पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि/किंवा अर्जदाराच्या रक्‍तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्‍तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगेसोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र.

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण Maratha Aarakshan information in Marathi पाहिले. या लेखात आम्ही मराठा आरक्षण बद्दल सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुमच्या कडे Maratha Aarakshan in Marathi बद्दल आजून काही माहिती असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा.

हे पण वाचा:

Leave a Comment