चंपाषष्ठी बद्दल संपूर्ण माहिती Champa Shashti Information in Marathi

Champa Shashti Information in Marathi नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आपण चंपाषष्ठी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पष्टी तिथी म्हणून ओळखले जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा म्हणजेच मल्हारी देवाचे नवरात्र हे सुरू होत असते. मनी मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले होते. या घटनेपासून मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चंपाषष्ठी हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. तर चला मित्रांनो आता आपण चंपाषष्ठी बद्दल संपूर्ण माहिती पाहूया.

Champa Shashti Information in Marathi
Champa Shashti Information in Marathi

चंपाषष्ठी बद्दल संपूर्ण माहिती Champa Shashti Information in Marathi

चंपाषष्ठी म्हणजे काय? (What is Champashashti in Marathi?)

मार्गशीर्ष शुल्क षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्हारी म्हणून ओळखला जातो. चंपाषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रातील जेजुरी या ठिकाणी खंडोबाचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. ज्या लोकांचा कुलदेवता खंडोबा आहे त्यांच्या घरात चंपाषष्ठी च्या निमित्ताने नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.

चंपाषष्ठीची कथा (The story of Champashashti in Marathi)

मणी मल्ली नावाच्या राक्षसांचा सनहार करण्यासाठी भगवान शंकराने हा मल्हारी अवतार घेतला होता. सह्याद्री पर्वताच्या रांगेतील सह्याद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेऊन तोच पुढे जेजुरी गड या नावाने प्रसिद्ध झाला. मनी मल्ली या राक्षसांबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून तर सहाव्या दिवसापर्यंत सलग युद्ध केले आणि षष्ठीला राक्षसांचा नायनाट करून विजय मिळवला त्या दिवसापासून या दिवसाला चंपाषष्ठी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर विजयी झाल्यावर देवांवर चाफांच्या फुलांचा वर्षाव करण्यात आला म्हणूनच तर चाफवृष्टी किंवा या दिवसाला चंपाषष्ठी असे नाव दिले गेले.

चंपाषष्ठी नवरात्री पूजा (Champashashti Navratri Puja in Marathi)

नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा चढवल्या जातात. तसेच सहा दिवस नंदादीप लावण्यात येते. तसेच जेजुरी प्रमाणेच खंडोबाच्या अन्य मंदिरांमध्ये ही हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या दिवशी घाटाची स्थापना, नंदादीप आणि मल्हारी माहात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे, शिवलिंगाचे दर्शन घेणे, ब्राह्मण – सुवासिनी यांना भोजन देणे असे केले जाते. या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला चढवले जाते. तसेच देवाला चढवलेले काही भाग हे कुत्र्यांना त्यांची पूजा करून खाऊ घालतात. यानंतर खंडोबाची तळी भरून आरती करण्यात येते.

मल्लारी मार्तंड (खंडोबाची प्रसिद्ध स्थाने)

भारतात खंडोबाची प्रसिद्ध १२ स्थाने आहेत ज्यांची नावे खालील प्रमाणे आहेत:

  • जेजुरी – पुणे
  • निंबगाव – पुणे
  • पाली पेंबर – सातारा
  • नळदुर्ग – धाराशिव
  • शेंगुड – नगर
  • सातारे – औरंगाबाद
  • माळेगाव – नांदेड
  • मैलारपू पेंबर -बिदर
  • मंगसुळी – बेळगाव
  • मैलारलींग – धारवाड
  • देवरगुड – धारवाड
  • मण्मैलार – बेळुळारी

चंपाषष्ठी बद्दल अधिक माहिती (More information about Champashashti in Marathi)

मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजे देव दीपावली किंवा छोटी दिवाळी म्हणून ओळखला जातो. चित्तपावनामध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे घराग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य चढवला जातो. या विधीमध्ये प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्याची संख्या ही वेगवेगळी असते. गावातील मुख्य देवता इतर उपदेवता किंवा देवता महापुरुष, वेतोबा ग्रामदेवता, इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जाते. तसेच काही कुटुंबांमध्ये पितरांसाठी हा नैवेद्य बाजूला काढून ठेवण्यात येतो.

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण Champa Shashti information in Marathi पाहिले. या लेखात आम्ही चंपाषष्ठी बद्दल सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुमच्या कडे Champa Shashti in Marathi बद्दल आजून काही माहिती असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा.

हे पण वाचा:

Leave a Comment